संसदेत गदारोळ झाल्यामुळे तब्बल ‘इतक्या’ कोटींचे झाले नुकसान

मुंबई : संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, अधिवेशन सुरू झाल्यापासून पेगासस हेरगिरी प्रकरण आणि इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षांच्या विरोधामुळे संसदेने १०७ तासांच्या निर्धारित वेळेपैकी केवळ १८ तास काम झाले आहे. परिणामी करदात्यांना आतापर्यंत १३३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

अधिवेशनाचे पहिले दोन आठवडे पेगासस हेरगिरीप्रकरण, शेतकरी आंदोलन आणि महागाईवर विरोधी पक्ष काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह इतर अनेक पक्षांच्या गोंधळामुळे संसदेचा वेळ वाया गेला. लोकसभा आणि राज्यसभेत या कालावधीत काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यात आले. संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू आहे. त्यानंतर सभागृहात विरोधकांनी पेगासस हेरगिरीप्रकरणाच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आणि महागाईला विरोध करत पहिल्या दिवसापासून संसदेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

पेगाससच्या मुद्द्यावरून विरोधाने आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना चांगलेच धारेवर धरले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचबरोबर सरकारने या हेरगिरीप्रकरणावर चर्चा करून जेपीसीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणीही विरोधकाने केली होती.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा