घराणेशाहीवर चालणाऱ्या पक्षाला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही; अमित शहाचं काँग्रेसवर टीकास्त्र

मुंबई : देशात सध्या भाजपचा विजयी रथ जोमाने पुढे जात आहे. यावेळी नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. त्यात उत्तर प्रदेशसह चार राज्ये पुन्हा एकदा भाजपने जिंकली. तर एकही राज्यात काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस नेतृत्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

अमित शहा म्हणाले कि, कुटुंबाच्या जोरावर पक्ष चालवणाऱ्यांना लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही,अशा शब्दात शहा यांनी काँग्रेसला खडेबोल सुनावले आहे. विरोधी कार्यकर्त्यांना मारून सत्ता बळकावणे ही आमची संस्कृती नाही. आमची विचारधारा, आमच्या नेत्याची लोकप्रियता आणि सरकारचे कर्तृत्व या जोरावर आम्हाला निवडणूक लढवून जिंकायची आहे, असेही शहा म्हणाले.

तसेच विरोधक सातत्याने आमच्यावर टीका करत आहे की , आम्ही पराभवाच्या भीतीने निवडणुका घेत नाही. मात्र तेच आम्हाला घाबरले आहे. विजयाचा एवढा आत्मविश्वास असेल, तर ६ महिन्यांनी निवडणुकीला कशाला घाबरता. नागरिकांचे लोकशाही हक्क हिरावून काँग्रेसच्या पंतप्रधानांनी रातोरात देशावर लादलेल्या क्रूर आणीबाणीला भीती म्हणतात, अशी टीकाही शहा यांनी काँग्रेसवर केली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा