सत्ताधारी शिवसेनेत मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचे पूर्ण सामर्थ्य; भाजपाची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. विशेषत: मुंबई शहरामध्ये तर पाऊस थांबायचं नावच घेत नसल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुंबईची तुंबई झाली आहे. या सगळ्या समस्यांना सर्वसामान्य जनतेला तोंड द्यावं लागत आहे. यावरून विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधायला सुरूवात केली आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी याच मुद्यावरून ठाकरे सरकारला धारेवर धरले. मुंबई आणि मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचे पूर्ण सामर्थ्य पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अतुल भातखळकर यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. यासोबतच भातखळकर यांनी एका दुर्घटनेचा व्हिडीओही ट्विट केला आहे .

या व्हिडीओमध्ये रस्त्यावर सगळीकडे पाणी साठलं असल्याचं दिसत आहे. एक व्यक्ती रस्त्यावरून जात आहे. आणि त्याचा पाय रस्त्यावरील चेंबरवर पडतो. ते चेंबर नीट बसवलं नसल्यामुळे तो खाली पडतो. हा सगळा प्रकार एका दुकानाबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ही घटना भांडुप व्हिलेज रोड परिसरातील असल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा