चिकन खाल्ल्याने कोरोना होतो हि अफवा : पशुसंवर्धन विभाग

नोव्हेल करोना विषाणू प्रादुर्भाव संदर्भात कुक्कुट मांस आणि इतर कुक्कुट उत्पादने यांच्या आहाराबाबत सोशल मिडियावर जी माहिती पसरवली जाते ती चुकीची असून आपल्याकडील कुक्कुट मांस आणि कुक्कुट उत्पादने  यांचा कोरोनो विषाणूशी संबंध नाही आणि ते वापरासाठी पुर्णतः सुरक्षित आहे अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.
दरम्यान ज्यांनी या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या त्याबाबत खात्याने  सायबर सेल कडे तक्रार दाखल केलीय. 3 फेब्रुवारी पर्यंत चिकन वर कोणताही परिणाम नव्हता मात्र 4 फेब्रुवारी पासून अफवांमुळे चिकनवर मोठा परिणाम झालाय, 4 ते २१ फेब्रुवारी या 15 दिवसाच्या काळात दररोज 10 करोड याप्रमाणे 150 करोड चे नुकसान झाले आहे, त्यामुळे नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये.
Loading...
दरम्यान पत्रकार परिषदेत राष्ट्रीय विषाणू संस्थेनेही आतापर्यंत झालेल्या तपासणीच्या अहवालाबाबत माहिती दिली, आतापर्यंत  चीनमधून परतलेल्या रुग्णांचे 1350  वैद्यकीय नमुन्याची तपासणी करण्यात आली, त्यापैकी केरळमधील 3 रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले, त्यांनाही योग्य उपचाराने डिस्चार्ज पोलिसीनुसार घरी सोडण्यात आले अशी माहिती राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिली, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.