एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणार ‘एवढा’ बोजा

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कामगारांनी सुरू केलेल्या संपावर आज तोडगा निघाला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषतद घेऊन एसटी कामगारांच्या पगारवाढीची घोषणा केली. एसटीच्या इतिहासातील ही सर्वाधिक वाढ असल्याचं त्यांनी सांगितलं. अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.

यावेळी मंत्री उदय सामंत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उपस्थित होते. आम्ही सरकारतर्फे एक प्रस्ताव ठेवला. विलीनीकरणाचा निर्णय समितीने सरकारडे दिला तर तो मान्य असेल. पण तो निर्णय येईपर्यंत किंबहूना निर्णय होईपर्यंत तिढा असाच ठेवता येणार नाही. त्यामुळे सरकारने कामगारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुळ पगारात वाढ वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

बैठक आटोपल्यानंतर अनिब परब हे अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात गेले. बैठकी दरम्यान कर्माचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव हा राज्य शासनातर्फे एसटी कर्मचाऱ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. यानंतर अनिल परब आणि शिष्टमंडळाची संयुक्त पत्रकार परिषद घेणार घेतली. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र या पगारवाढीमुळे वर्षाला ६०० ते ६५० कोटींचा आर्थिक बोजा महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा