InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सलून मालकाला कोट्यावधीचा चुना

- Advertisement -

२१ नामांकित सलून आणि ब्यूटी पार्लरची परदेशी सौंदर्य प्रसाधनांमध्ये (कॉस्मेटिक्स) १ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरएके पोलिसांनी रोनीत शहा (२५), निलेश दुबे (२८), लालजी गुप्ता (४५), अन्वर खान (२४) आणि शितल वऱ्हाडे (३१) अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आरएके पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या एका परदेशी कंपनीला त्यांचा व्यवसाय मुंबईत वाढवायचा होता. त्यासाठी त्यांनी एका खासगी कंपनीला वितरक म्हणून नेमले होते. त्यांनी नेमलेला सेल्समन रोनीत ऊर्फ जयप्रकाश शहा याने त्याचे ग्राहक असलेल्या सलून व ब्यूटी पार्लरला या कंपनीचा माल मोठ्या प्रमाणात विकला. यावेळी त्याने परदेशात पाठविण्यासारखी विविध प्रलोभने या सलून कर्मचारी व मालकांना दाखवली. त्याचप्रमाणे कोणताही माल उरल्यास तो परत आम्हीच खरेदी करू असे गाजर दाखविले.

३ सप्टेंबर २०१८ ते ३ जानेवारी २०१९ या कालावधीत आरोपींनी ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी रोनीत शहा हा मुख्य आरोपी आहे. त्याच्यानंतर इतर दोन सेल्समननेही फसवणूक केली. याप्रकरणी आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम ४२०, ४१९, ४०८, ४११ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन लाखांचा माल हस्तगत करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.