InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

धोनीला भाजपमध्ये यायचे असेल तर त्याच स्‍वागत

- Advertisement -

भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्‍डा यांनी आगामी झारखंड विधानसभा निवडणुकांध्ये विजय मिळविण्यासाठी राज्‍यस्‍तरावर मोठे फेरबदल करणार असल्‍याचे संकेत दिले आहेत. संघटनात्‍मक स्‍तरावर आगामी विधानसभेच्या दृष्‍टीने तयारी सुरू असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. झारखंडमध्ये नोव्हेंबर- डिसेंबर दरम्‍यान विधानसभा निवडणूक होत आहे. यावेळी महेंद्र सिंह धोनीच्या पक्ष प्रवेशावरून प्रश्न विचारला असता, जेपी नड्‍डा यांनी धोनीला भाजपमध्ये यायचे असेल तर स्‍वागत असल्‍याचे म्‍हटले आहे.

गेल्‍या काही दिवसांपासून धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्‍याची चर्चा रंगली आहे. त्‍या पार्श्वभूमीवर नड्‍डा यांना प्रश्न विचारला असता त्‍यांनी धोनी पक्षात येणार असेल तर त्‍याचे स्‍वागत आहे अशी प्रतिकिया दिली.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.