InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शालेय पोषण आहारात ज्वारी, बाजरीची भाकरी, नाचणीचा समावेश

शालेय पोषण आहारात तांदुळाची खिचडी कमी करुन विद्यार्थ्यांना ज्वारी आणि बाजरीची भाकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यां गरमा-गरम भाकरीचा आस्वाद घेता येणार आहे. मात्र, या नवीन योजनेमुळे शाळेतील शिक्षक त्रस्त झाले आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारकडून 1 ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यान्ह भोजन दिले जाते. त्यामध्ये, विद्यार्थ्यांना तांदळाची खिचडी, मटकी, वटाणा, चना या कडधान्यांचा समावेश होता. मात्र, शासनाने विद्यार्थ्यांना अधिक पौष्टीक अन्न मिळावे, यासाठी या मध्यान्ह भोजनात बदल केला आहे. त्यानुसार, ऑक्टोबर महिन्यापासून विद्यार्थ्यांन जेवणात ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय अन्न महामंडळाकडून सर्वच शाळांना ज्वारी अन् बाजरीचा पुरवठा करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या शालेय पोषण आहारातच अनेक अडचणी येत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply