प्रकाश आंबेडकर आणि विनायक मेटेंची गुप्त बैठक

भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी वंचित बहुजन आघाडी निर्माण केली आहे, तर शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे सत्तेत असूनही सत्तेच्या पदापासून वंचित आहेत. योगायोगाने शनिवारी (१२ जानेवारी) या दोन्ही नेत्यांची भेट झाली

त्यांच्यात २५ मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. त्यांच्या चर्चेचा संवाद समजला नसला, तरी विनायक मेटेंची नाराजी उघड आहे. या दोघांमधील गुफ्तगूची राजकीय वर्तुळात चर्चा होत असून यामुळे काही नवीन समीकरणे उदयाला येणार का, असे संकेत मात्र यातून दिसत आहेत.

आज घडीला विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष सत्ताधारी महायुतीत असला, तरी त्यांना भाजपने सत्तेच्या पदापासून वंचित ठेवलेले आहे. एवढे कमी की काय, स्थानिक भाजपाकडूनही त्यांच्या पक्षाचा वारंवार अपमान केला जात आहे. त्यामुळे भाजपवरील नाराजी त्यांनी अनेकवेळा उघड बोलून दाखविलेली आहे. आजच्या बैठकीतील चर्चेच्या संवादाचा  तपशील बाहेर आलेला नसला तरी वंचित आघाडी आणि मेटेंची नाराजी यातून काही नवे समीकरण तर उदयास येणार नाही ना, अशी शक्‍यताही वर्तविली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.