InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘वडापाव विकणारा मदत करतो मग आपल्याला लाज वाटली पाहिजे’; उर्मिलाने ‘बॉलिवूड’ला सुनावलं

- Advertisement -

अभिनेत्री आणि काँग्रेसच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी आज पूरग्रस्त सांगलीची पाहणी केली. त्यांनी सांगलीवाडी, गणपती पेठ या भागाला भेट देऊन लोकांशी संवाद साधला आणि मदतही केली. या महाभयानक आपत्तीत बॉलिवूडने मदतीचा हात पुढे केला नाही अशी टीका करण्यात येतेय. त्यावर बोलताना उर्मिला यांनी बॉलिवूडला चांगलंच सुनावलं. त्या म्हणाल्या मदत करा असं मी कुणाला सांगणार नाही. मात्र साधा वडापाव विकणारा आपल्या तुटपुंज्या कमाईतून मदत करतो. त्यामुळे आपल्याला लाज वाटली पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या परीने मदत करावी असं आवाहनही त्यांनी केलं.

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील महापुराचा विळखा सैल होऊ लागला आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, पूरसंकटानंतर आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या समस्या निर्माण होऊ नये, यासाठी युध्दपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ कायम आहे. अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सुध्दा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे.

Loading...

- Advertisement -

प्रार्थनेसाठी जोडलेल्या २ हातांपेक्षा मदतीसाठी सरसावलेला १ हात कधीही महत्वाचा असतो. मी मदत करून खारीचा वाटा उचललाय. तुम्हीही मदत करा, असे उर्मिलाने म्हटले आहे. उर्मिलाने सांगली कोल्हापूर गाठत पूरग्रस्तांना मदतीचा निर्णय घेतला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.