InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

यवतमाळच्या शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरुच

- Advertisement -

यवतमाळ / संदेश कान्हु : यवतमाळ जिल्हा हा व्हाइट सिटी म्हणून ओळखला जात होता मात्र कांही वर्षात ही ओळख पुसल्याजाऊन यवतमाळ जिल्ह्यची नवी ओळख महाराष्ट्र भर झाली आहे ती म्हणजे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्य. एकेकाळी समृद्ध असलेल्या याच जिल्ह्यत आजवर अनेक शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारी पना आसमानी व सुलतानी संकटामुळे आत्महत्या केली. आत्महत्येच्या सुरुअसलेल्या या सत्रामुळे अनेक कुटुंब आज पोरके झाले आहेत. शासन स्तरावर शेतकऱ्यांसाठी अनेक प्रयत्न होतांना दिसतात मात्र नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांच्या पिच्छा काही सोडतांना दिसत नाही. त्यामुळेच यवतमाळच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातिल अश्रु अनावर झालेत.

- Advertisement -

खरीप हंगामातील कापूस पिकांवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. हजारो हेक्टर वरील कापूस पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च सुद्धा निघु शकला नाही. याच बोंडअळीचा प्रदुर्भाव होऊ नये म्हणून ख़बरदारिचा उपाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कपाशीवर किटकनाशक फवारणी केली मात्र अडानी शेतकरी राजाने योग्य पद्धतीने फवारणी न केल्यामुळे त्यास आपल्या जीवाशी मुकावे लागले. यवतमाळ जिल्ह्यत तब्बल 28 शेतकरी तसेच शेतमजूराणां किटकनाशक फवारणीमुळे आपले जीव गमवावे लागले. शेतकरी हा राब राब राबतो काबाड़ कष्ट करतो आणि परिस्थितिशी झगड़तो मात्र सातत्याने होणाऱ्या नैसर्गिक आघातांमुळे माझा शेतकरी राजा खचून गेला आहे.

खरीप पिक गेले तर काय रब्बी पिकातुन समृद्धिचा मार्ग स्विकारु अशी आशा बाळगत माझा अन्नदाता सेप्टेंबर महिन्यात कामास लागला. चार महीने उलटले शेतात पिक हिरवेगार दिसूलागले आता मात्र चिंता दूर झाली असे भासु लागले. सर्वांचे कर्ज फेडु ताठ मानेने जगु असा विचार शेतकरी राजा करू लागला मात्र फेब्रुवारी महीना आला अन्न होत्याच न्हवत झांल. अन्नदात्यावर आसमानी संकट कोसळूण पडल. रात्रंदिवस लेकरा सारखे जपलेल्या पिकांवर गारांचा मारा झाला. ती गारही साधीसूधी न्हवती टपुरी ग़ार व वादली वाऱ्यांने कष्टकरी शेतकऱ्यांच्या पिकांना झोपवून नष्ट केले नाहीत तर अन्नदात्याचे स्वप्न भंग केलेत. शेतकरी विनवनी करतो तेव्हा हा पाउस पाठ फिरवतो मात्र नको त्या वेळेस येऊन थैमान घालतो. शेतकरी जगला तर देश जगेल अन्यथा सर्वत्र हाहाकार मजेल. कर्म चांगले असेल तर फळ निश्चितच चांगले मिळते अशे एकिवात आहे मात्र इतरांचे पोट जगवणाऱ्या माझ्या शेतकरी राजास त्यांच्या फळा पासून वंचित का राहाव लागतय हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.