बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा अभिमान आहे – बाळासाहेब ठाकरे

अयोध्येतील राम मंदिराचे आज (5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. यासाठी उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज सामना वृत्तपत्राने राम मंदिराच्या भूमीपूजनावर अग्रलेख लिहिला आहे. या अग्रलेखात हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिले आहे.

आनंदाची बातमी : जगातील सर्वात मोठी कंपनी विकत घेणार TikTok अ‌ॅप

“बाबरी पाडली त्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. या कृतीनं बाळासाहब ठाकरे हिंदूह्रदयसम्राट बनले. आजही ते स्थान अढळ आहे. सगळ्याच्या त्यागातून, संघर्षातून रक्त आणि बलिदानातून राममंदिर या मातीत कारसेवकांच्या त्यागाचा गंध आहे हे विसणारे रामद्रोही ठरतील. राममंदिर भूमीपूजनाच्या प्रश्नाने राजकारही कायमचे संपावे. श्रीरामाचीही तीच इच्छा असेल, सारा देश आज एकसुरात गर्जत आहे”, असं अग्रलेखात म्हटले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे आज एकदिवसीय पुणे दौऱ्यावर ; कोरोना उपाययोजनांचा घेणार आढावा

शरयू नदीने तेव्हा राममंदिरासाठी गोळ्या झेलणाऱ्या शेकडो कारसेवकांना पोटात घेतले. रामभक्तांच्या रक्ताने लाल झालेल्या शरयू नदीच्या तीरावर भव्य मंदिराचा संकल्प पूर्ण होत आहे. हा ऐतिहासिक, रोमांचक आणि प्रत्येक भारतीयांची छाती गर्वाने फुलून यावी असा क्षण आहे. रामायण हा भारतीय जनतेचा प्राण आहे. राम हा रामायणाचा प्राण आहे. राम हा मर्यादापुरुषोत्तम, एकवचनी आहे. राम म्हणजे त्याग, राम म्हणजे साहस आहे. राम म्हणजे आपल्या देशाची एकात्मता आहे. अशा रामाचे मंदिर त्याच्याच अयोध्या नगरीत, त्याच्या जन्मस्थानी व्हावे यासाठी हिंदूना मोठा लढा द्यावा लागला. त्या लढ्याची सांगता आज होत आहे, असंही अग्रलेखात सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.