InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शेतकऱ्यांना नाडणाऱ्या विमा कंपन्यांना शिवसेना धडा शिकवणार

पीककर्जात शेतकऱ्यांना नाडणाऱ्या विमा कंपन्यांना शिवसेना धडा शिकवणार असल्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर आता बुधवार (ता. 17) च्या मोर्चाचे जंगी आयोजन करण्याची तयारी सुरू झाली आहे. हा मोर्चा शिवसेनेचे मुंबईत प्रचंड मोठे शक्‍तिप्रदर्शन व्हावे, यासाठी शिवसेना सरसावली असून, राज्यातील सर्व खासदार, आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख, पदाधिकारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

मुंबईत अनेक वर्षांनंतर शिवसेनेचा मोर्चा होत आहे. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे दोन्ही नेते मोर्चात सहभागी होणार आहेत. यामुळे या मोर्चाच्या माध्यामातून मुंबई जॅम करण्याची ताकद दाखवण्यात येईल, असे मानले जात आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची अनेक पीक विमा कंपन्यांनी अडवणूक केली आहे. या कंपन्यांच्या मुंबईतील कार्यालयावर शिवसेना धडकणार असून प्रत्येक शेतकऱ्याला पीकविम्याचा लाभ मिळावा, यासाठी हा मोर्चा आयोजित केला आहे. शिवसेना भवन ते वांद्रे-कुर्ला कॉम्लेक्‍समधील ऍक्‍सिस बॅंकेच्या मुख्यालयाच्या दरम्यान हा मोर्चा होणार आहे. हा संपूर्ण भाग वर्दळीचा असल्याने मोर्चाच्या दरम्यान जॅमची भीती आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply