मराठी शिवसेनेचा आत्मा, अशी विधाने दक्षिणेत करून दाखवा; संजय राऊतांचे जलील यांना आव्हान

मुंबई : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा मोठा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा लहान असावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक असणारा आहे.

यावरून आता सरकारच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यानंतर आता यावरून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. असे का होते की जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलतात. तसेच मराठी पाट्यांचा खर्च सरकारने द्यावा अशी मागणी देखील जलील यांनी केली होती.

त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. खर्च द्यायचा की नाही ते आम्ही बघून घेऊ. तुम्ही महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्राच्या मातीचे खाता, मराठी मातीचा श्वास घेता, पण अशा प्रकारच्या विधानांना बेइमानी म्हणतात. शिवसेनेचा जन्म हा मराठी अस्मितेच्या प्रश्नावर झाला आहे. ही भाषा दक्षिणेत जाऊन करा. मराठी हा शिवसेनेचा आत्मा आहे. त्याच्याशी आम्ही तडजोड करणार नाही, असेही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा