InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कुशल बद्रिकेच्या घरात राहतो ‘स्पायडर मॅन’

‘चला हवा येऊ द्या’ मालिकेतील कॉमेडीयन रसिकांचे मनोरंजन करत आहेत. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारे, त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारे आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके.  त्याचे कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात.

कुशल सोशल मीडियावरही तितकाच एक्टिव्ह आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि त्याने म्हटलं की, आमच्या घरात एक स्पायडर मॅन राहतो. ज्याच्या जाळ्यात आमचं अख्खं विश्व गुंतलंय.

हा स्पायडर मॅन म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून त्याचा मुलगा आहे. हा फोटो शेअर करीत त्याला घरातील स्पायडर मॅन असं संबोधलं आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.