अमित शाह यांच्या पायगुणाने ठाकरे सरकार जावं : नारायण राणे

सिंधुदुर्ग : देशाचे गृहमंत्री अमित शहा 6 फेब्रुवारी रोजी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्याचे सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत नियोजन करण्यात आले.

अमित शहा हे दुपारी 1.50 वा. गोवा येथून हेलिकॉप्टरने पडवे मेडिकल कॉलेज येथे येणार असून उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने ते दोन तास सिंधुदुर्गांत थांबणार आहेत.अमित शहा यांच्या दौऱ्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक आमदार खासदार व भाजपची नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने त्यांच्या स्वागतासाठी भाजपा सिंधुदुर्गात सहयांची मोहिम राबविणार आहे. भाजपसाठी हा दौरा निश्चितच फलदायी आहे. केंद्रांच्या योजना घराघरांत पोहोचविण्याचे आवाहन जिल्हा कार्यकारिणीत करण्यात आले.

यादरम्यान, सिंधुदुर्ग येथील ‘लाईफटाईम’ वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार आहेत. त्याआधी भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अमित शाह यांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं, अशी इच्छा नारायण राणेंनी बोलून दाखवली आहे. शिवसेनेशी युतीचा प्रश्नच येत नाही, अशी पक्षातली भूमिका आहे. विधानसभा अध्यक्षपदाबाबत भाजपने बाजी मारली पाहिजे, असं मत देखील राणे यांनी व्यक्त केलं आहे.

शिवसेनेने अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे. दरम्यान, यावरही राणे यांनी भाष्य केलं आहे. ‘पुढच्या निवडणुकीमध्ये मुंबईचा महापौर भाजपचा असेल, गुजराती समाज मोदी आणि शाह यांना सोडून बिनबुडाच्या लोकांकडे जाणार नाही. आम्ही फोडाफोडीत पीएचडी केली आहे. तसंच युतीबाबत मनसेनं ठरवावं, शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजप समर्थ आहे,’ अशी भूमिका नारायण राणे यांनी मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा