InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

महाराष्ट्रात आघाडीचं सरकार येणार – प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

- Advertisement -

‘प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर  जबाबदारी आहे. या जबाबदारीत यशस्वी होणार आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात आघाडीचं सरकार येणार,’ असं म्हणत काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर थोरात यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेत आपला अजेंडा स्पष्ट केला.

‘आमच्या पक्षातून काही लोक गेले. पण जेव्हा कोणी पक्ष सोडत असतं त्याच्याजागी नवीन लोकांना संधी मिळून तरुण नेतृत्व निर्माण होत असतं. त्यामुळे गेलेल्या लोकांची चिंता नाही. आम्ही सर्व नेते आता एकदिलाने काम करून आगामी काळात महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणू,’ असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

Loading...

- Advertisement -

दरम्यान, काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीत पराभवामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मोठ्या पदावरील नेत्यांनी आपापले राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवले होते. त्यात अशोक चव्हाण यांचाही समावेश होता.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.