InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राज्यात येत्या पाच दिवस मान्सून हुलकावणी देणार

येत्या पाच दिवस पाऊस हुलकावणी देणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भ, खान्देशात पुरेशा पावसाअभावी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सुरुवातीच्या पावसाने सुखावलेल्या बळीराजाच्या चरणी पुन्हा चिंता पडणार आहे. राज्यातील पुढचे पाच दिवस हे कोरडेच असणार आहे.

मान्सूनचा अक्ष बदलल्याने उत्तर भारत, ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. त्यामुळे दक्षिण भारतासह राज्यात मान्सूनने पाठ फिरवली आहे. याचा परिणाम म्हणून 17 जुलैपर्यंत राज्यात कोकण वगळता पावसाचा जोर राहणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित राज्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असे वेधशाळेने कळवले आहे.

राज्यात 17 जुलैपर्यंत मान्सून विश्रांती घेणार आहे. यानंतर पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. दर मौसमात मान्सूनचा अक्ष एक-दोनदा बदलत असतो. ही सामान्य बाब आहे. त्यातच राज्यात यंदा दोन आठवडे पाऊस उशिरा सुरू झाला. मराठवाड्यात आधीच पाऊस कमी पडतो. यंदा तो देखील पुरेसा नाही. म्हणून मराठवाड्यात या खंडाची तीव्रता अधिक असणार आहे. विदर्भात देखील यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मुंबईत बराच पाऊस झाला आहे. यासोबतच कोकण, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी अशा अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली. राज्यात अनेक दुर्घटना घडल्या. जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प झाला होता. खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरून वाहतूकही थांबवण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply