पुढील दोन ते तीन आठवडे राज्यात कोरडे हवामान राहणार

दोन आठवडे जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टय़ांचे अस्तित्व आता अल्पकाळ राहणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी होत जाणार आहे.  काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पावसाला पोषक असलेली हवामान प्रणाली कमकुवत झाल्यामुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर ओसरणार आहे.  कोकणासह राज्यात तुरळक ठिकाणीत हलक्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुढील दोन ते तीन आठवडे राज्यात कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये कोकणासह विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बहुतांश ठिकाणी दुपारी उन्हाचा चटका जाणवू लागल्याने तापमानात वाढ झाली आहे. सध्या कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी सरकत आहे. त्यामुळे ओडिसा, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.