रविना टंडनचे वक्तव्य सरकारचे लांगुलचालन करणारे – सुप्रिया सुळे

पुणे: आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना विनाजामीन अटक करा, असे ट्विट अभिनेत्री रविना टंडन हिने दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यावर बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे हे वक्तव्य म्हणजे सरकारचे लांगुलचालन करणारे असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून न घेता असा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. शिक्षक भरतीसाठी पुण्यात सेन्ट्रल बिल्डींग जवळ सुरु असलेल्या उपोषण स्थळी सुळे यानी भेट दिली. यावेळी सुळे पत्रकारांसोबत बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, टंडन यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली. वास्तव्यापासून ते दूर असतात गरीब शेतकरी किती कष्ट करतात. याची जाणीव त्या महिलेला नाही आहे . असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान , शरद पवार शेतकरी आंदोलन भडकवत असल्याची टीका होत असतांना. ‘पवार साहेबांवर टीका केल्या शिवाय काहींच राजकारण होत नाही.’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी टीकाकारांना सुनावले.

राज्यात शेतकरी आंदोलन सुरु असून शरद पवार आंदोलन भडकावण्याच काम करत असल्याची टीका होत आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या “राज्याचा ५० वर्षाचा इतिहास आहे. जोपर्यंत पवार साहेबांवर टीका करत नाही तोपर्यंत काही जणांनाच राजकारण होत नाही. तसेच त्याची बातमीही होत नाही.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा