सात वर्षे भाजपाला मिळालेले यश हे मोदींमुळेच ; संजय राऊतांनी केले जाहीर कौतुक

मुंबई : नरेंद्र मोदी भाजपाचे आणि देशाचे सर्वात मोठे नेते आहेत असे मी मानतो. मोदींच्या चेहऱ्यामुळेच गेल्या सात वर्षात भाजपाला यश मिळाले आहे हे नाकारता येणार नाही, असे शिवेसना खासदार संजय राऊत म्हणालेत. राऊत उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून यावेळी नाशिक येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, नरेंद्र मोदी देशाचे नेते असून ज्या पक्षातून ते पुढे गेले आहेत त्यांना प्रत्येक निवडणूक त्यांच्या नावावरच जिंकावी असे वाटत असेल. अटलबिहारी वाजपेयींचाही फोटो सर्व ठिकाणी वापरला जात होता. बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा आणि फोटोही कार्यकर्ते वापरत असतात. आदेश काढला म्हणून चेहरा वापरणे थाबंत नाही. ते शेवटी कार्यकर्त्यांवर अवलंबून असते.

मोदींनी प्रचाराला जाताना पंतप्रधान म्हणून जाऊ नये आणि पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करु नये ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा यंत्रणेवर दबाब असतो. पश्चिम बंगालमध्ये आपण पाहिलं आहे. मनमोहन सिंग किंवा इतर कोणीही असलं तरी पंतप्रधान म्हणून त्यांनी प्रचार करु नये. ते देशाचे पंतप्रधान असतात, असे संजय राऊत म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा