सुजय विखे पाटीलांवर ठाकरे सरकारने ‘ही’ कारवाई करत दिला मोठा धक्का!

अहमदनगर : सध्या सुजय विखे पाटील यांच्या ताब्यात असलेला राहुरीतील डॉ. बाबुराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखाना काही वर्षांपासून आर्थिक टंचाईमुळे बंद होता. मात्र आता पुढच्या वर्षी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होणार असल्यानं आता कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी सुजय विखे पाटलांनी पुन्हा कारखान्याचं पुनरूज्जिवन केलं होतं. त्यातच आता ठाकरे सरकारने सुजय विखे पाटलांना मोठा धक्का दिला आहे.

डॉ. बाबुराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर आता महावितरणने मोठी कारवाई केली आहे. या साखर कारखान्याला करण्यात येणारा वीज पुरवठा महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागांतर्गत येणाऱ्या महावितरण कंपनीने खंडित केला आहे. त्यामुळे आता कारखान्याचं कामकाज ठप्प झालं आहे. अनेकदा नोटीस पाठवून देखील कारखान्यानं थकित असलेलं वीजबिल भरलं नव्हतं. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

कारखाना बंद असल्याने याचा फटका आता कामगार वसाहतींना होताना दिसत आहे. वीज नसल्यानं त्या भागात काळोख पसरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कारखाना आर्थिक टंचाईत आहे. तर कामगारांची देणी देखील थकली आहेत.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा