InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अमित शहांच्या नेतृत्वात होणार ‘या’ तीन राज्यातील विधानसभा निवडणुका

- Advertisement -

आगामी तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका भाजप अमित शाह यांच्या नेतृत्वातच लढणार आहे. या वर्षाच्या अखेरीस झारखंड, महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभा निवडणुका होणार आहेत. ही तिन्ही राज्ये भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.

या तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच भाजपला आपला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वात भाजपने लोकसभेत प्रचंड विजय मिळवत तब्बल 303 जागा जिंकल्या. अमित शाह गृहमंत्री बनल्यानंतर जे.पी. नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले आहे. नवे अध्यक्ष आणि पूर्ण देशातील संघटनेतील निवडणुकीसाठी भाजपने राधामोहन सिंह यांच्या नेतृत्वात निवडणूक समितीची स्थापना केली आहे.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.