InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

तिन्ही डॉक्टरांकडून छळच- अहवालाचा शिक्कामोर्तब

- Advertisement -

डॉ. पायल तडवी हिचा डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खांडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहेर यांनी छळ केला असल्याचा निष्कर्ष राज्यस्तरीय चौकशी समितीने काढला असला तरी या तिन्ही डॉक्टरांकडून जातीय शेरेबाजी केल्याचे ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत, असे समितीने अहवालात स्पष्ट केले आहे.

डॉ. पायल यांच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने गेल्या आठवडय़ात अहवाल राज्य सरकारकडे सादर केला होता. याची एक प्रत वैद्यकीय शिक्षण विभागालाही प्राप्त झाली आहे.

- Advertisement -

मुंबई :डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सध्या अटकेत असलेल्या तीन महिला डॉक्टरांची न्यायालयीन कोठडी २४ जूनपर्यंत वाढवण्यात  आली. त्यांच्या जामीन अर्जावर १७ जून रोजी सुनावणी होणार आहे.

न्यायालयाच्या सुनावणीवर तिघींनी विनंती केली की, आम्ही काहीही केलेले नाही. आमच्यावर अन्याय झाला आहे. आमच्या जामीन अर्जावर लवकरात लवकर सुनावणी घ्या आणि आमची येथून सुटका करा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.