तब्बल 7 तास 20 मिनिटांचा आहे ‘या’ चित्रपटाचा ट्रेलर

एखाद्या सिनेमाची लांबी किती असू शकते. सर्वसामान्यपणे ती दीड-दोन तास ते जास्ती जास्त तीन-साडेतीन तासांपर्यंत असू शकते. पण एक चित्रपट असा आहे ज्याचा ट्रेलर 7 तास 20 मिनिटांचा आहे. तर पूर्ण चित्रपटाची लांबी 720 तास इतकी आहे. आता एवढा मोठा चित्रपट कोण पाहणार हा प्रश्नच आहे. तरीही इतक्या मोठ्या लांबीचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फक्त एकच शो होणार आहे. त्यानंतर चित्रपटाची असलेली एकमेव कॉपी नष्ट केली जाणार आहे.

जगातील सर्वात जास्त लांबीच्या चित्रपटाचा विक्रम स्वीडनमधील एरिका मॅग्नसन आणि डॅनियल अँडरसन यांच्या नावावर आहे. त्यांचा लॉजिस्टिक्स नावाचा चित्रपट 857 तासांचा होता. सलग पहायचा म्हटला तर 35 दिवस 17 तास इतका वेळ लागेल. जगातील सर्वात जास्त लांबीचा चित्रपटाचा विक्रम अद्याप याच चित्रपटाच्या नावावर आहे.

दरम्यान, 720 तासांचा चित्रपट तयार केल्यानंतरही एक वेगळा विक्रम होणार आहे. अॅम्बियंन्स नावाचा हा चित्रपट स्वीडिश दिग्दर्शक अँडर्स वेबर्ग यांचा शेवटचा चित्रपट असणार आहे. प्रायोगिक चित्रपट म्हणून या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय जुन्या, बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या चित्रपटांचे रिमेक करण्याच्या ट्रेंडचा निषेध म्हणून हा चित्रपट तयार केला आहे.

Loading...

अॅम्बियन्सचे आतापर्यंत 2 ट्रेलर आले आहेत. याचीही लांबी 72 मिनिट आणि 7 तास 20 मिनिटं इतकी आहे. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून याचे शूटिंग सुरू आहे. विशेष म्हणजे चित्रपट सलग चित्रित करण्यात आला आहे. यात कॅमेऱा जरासुद्धा हलवण्यात आलेला नाही.

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्याची एकमेव कॉपी नष्ट करण्यात येणार आहे. याचे कारण सांगताना अँडर्स वेबर्ग यांनी म्हटलंय की, सध्या अस्तित्वात नसलेला सर्वात जास्त लांबीचा चित्रपट अशी ओळक या चित्रपटाला मिळावी. इतक्या मोठ्या लांबीचा चित्रपट 31 डिसेंबर 2020 ला प्रदर्शित कऱण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.