भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला : संजय राऊत

मुंबई : भगवा झेंडा लावणे ही महाराष्ट्रीची शान आहे, प्रतिष्ठा आहे. ज्यांच्या नावाने आपण हे राज्य चालवत आहोत त्या छत्रपती शिवरायांचा आज राज्याभिषेकदिन आहे. ज्या दिवसाने आम्हाला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची आणि पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली, त्याला विरोध करणारे हे नतदृष्टे कोण आहेत? असा सवाल करत, सरकारने अशा घुबडांची काळजी न करता, फिकीर न करता, शिवरायांच्या या भगव्याची प्रतिष्ठा राहील, अशा प्रकारे कठोर कारवाई करावी, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. याच बरोबर, भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला, असेही राऊत म्हणाले.

भगवा झेंडा महाराष्ट्रावर किंवा शासकीय कार्यालयांवर फडकणे, हे आपले स्वप्न आहे, आपला स्वाभिमान आहे. स्वातंत्र्य लढ्यात भगव्याने अनेक स्वातंत्र्य सैनिकांना लढण्याची प्रेरणा दिली. तसेच अशा पद्धतीने भगवा फडकावणे हा अजिबात तिरंग्याचा अपमान नाही, असं संजय राऊत म्हणाले.

भगव्याचे तेज होते म्हणून हा देश स्वातंत्र्य लढ्यात लढू शकला. अनेक क्रांतीकार या भगव्या ध्वजाच्या तेजातून निर्माण झाले. त्यांच्या पाठीशी या भगव्या ध्वजाची आणि छत्रपती शिवरायांचीच प्रेरणा होती. हे जर कुणाला कळत नसेल, तर अशा लोकांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असं म्हणत राऊतांनी गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा