अमेरिकेने एकादशीला यान सोडले म्हणून यशस्वी झाले – संभाजी भिडे

‘अमेरिकेने आतापर्यंत 38 वेळा चंद्रावर उपग्रुह सोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. तेव्हा नासाच्या वैज्ञानिकाने भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि उपग्रह सोडला आणि तो यशस्वी झाला. अमेरिकेने एकादशी दिवशी उपग्रह सोडला म्हणूनच तो यशस्वी झाला,’ असं विधान शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलं आहे. संभाजी भिडे यांच्या या अजब तर्कटामुळे पुन्हा एकदा ते टीकेचं लक्ष्य होण्याची शक्यता आहे.

‘भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नसून एक सेकंदांचा हजारावा भाग मोजण्याची पद्धतसुद्धा भारतीय कालपमापन पद्धतीमध्ये आहे. अमेरिकेने याच कालमापन पद्धतीचा वापर केल्यामुळे त्यांचा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयोग यशस्वी झाला,’ असं संभाजी भिडे यांचं म्हणणं आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.