InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पश्चिम बंगालमध्ये सीपीएम उमेदवारावर जमावाकडून हल्ला

मतदानादरम्यान पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावर प्रचंड हिंसा होत आहे. दरम्यान, रायगंज येथील इस्लामपूरमध्ये सीपीएम उमेदवार मोहम्मद सलीम यांच्यावर जमावाने हल्ला केला असून, त्यांची गाडी सुद्धा फोडण्यात आली आहे. या हल्ल्यामध्ये मोहम्मद सलीम यांना कोणतीही इजा झाली नाही.

सीपीएम उमेदवार मोहम्मद सलीम यांच्यावर जमावाने केलेल्या हल्ल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. मोहम्मद सलीम प्रवास करत असलेल्या या गाडीवर एकदम बेसावध असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाकडून याची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे.

महाराष्ट्र, आसाम, छत्तीसगढ़, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर, मणिपुर आणि त्रिपुरा मध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी ३४ जागांसाठी मतदान होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply