“कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांचा आवाज हरवला” 

मुंबई : तब्बल 11 वेळा आमदार झालेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणपतराव देशमुख यांच्या निधनावर शोक व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.

“कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे गणपतराव देशमुख यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल,” असं शरद पवार म्हणाले.

“लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 1 वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे,” अशा भावना शरद पवारांनी व्यक्त केल्या आहेत.

तसेच, “राजकारणातील एक साधं आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपलं…आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील. गणपराव यांनी सर्वाधिक काळ आणि सातत्याने मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलं ते मला जास्त महत्वाचं वाटतं,”असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा