नामर्द आणि माजोरड्या वृत्तीला चिरडले पाहिजे; साताऱ्यातील ‘त्या’ घटनेवरून चित्रा वाघ संतापल्या

सातारा : सातारा जिल्ह्यातील पळसवडे येथील माजी सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ऑन ड्युटी असलेल्या महिला वनरक्षकावर एका व्यक्तीने हल्ला केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील पळसवडे येथे घडला आहे.
पळसवडे येथील माजी सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याच्या ह्या व्हायरल व्हिडिओ मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये मारहाण झालेली महिला कर्मचारी तीन महिन्याच्या गर्भवती असून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण झाल्याची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध होतो आहे.
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेचा निषेध करत कडक कारवाईची मागणी केली व गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्यावर टीका केली. चित्रा वाघ यांनी ट्विट केले, साताऱ्यात पळसवडेचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी गर्भवती वनरक्षक महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. अशा नामर्द आणि माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडले पाहिजे.
ही घटना शंभुराज देसाई यांच्या सातारा जिल्ह्यातील आहे. त्यामुळे वाघ यांनी म्हटले आहे की ‘शंभुराज देसाई, तुम्ही गृह राज्यमंत्री… तुम्हालाच स्वतःचा जिल्हा सांभाळता येत नसेल तर राज्य कसे सांभाळणार?” या घटनेची राज्य महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे. याबाबत सातारा पोलीस अधीक्षकांकडे अहवाल मागवला असून कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- नगरपंचायत निवडणुकांवरून रोहित पवारांचा भाजपाला सणसणीत टोला म्हणाले…
- उत्पल पर्रीकर ‘आप’कडून लढणार? पणजीतून तिकिटाची खुली ऑफर
- उत्पल पर्रिकरांचे तिकिट भाजपने कापले, गोव्यातील ३४ उमेदवारांची यादी जाहीर
- राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती
- भाजप क्रमांक एकचा विरोधी पक्ष, त्यांना आमच्या शुभेच्छा; संजय राऊतांचा चिमटा