पवारांचा जन्मच पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहण्यात जाणार ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ

“राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेली काँग्रेस सत्तेत आहे. मात्र भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधी पक्षात आहे. राज्यात ही लोकशाहीची थट्टा सुरू आहे. मात्र, फासा आम्हीच पलटवू. शिडीशिवाय आम्ही हा फासा पलटवू आणि फासा खूप मोठा असेल”, असा थेट इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीला दिला आहे.

यानंतर पुढे यावर राज्यसभा खासदार नारायण राणे यांची 22 वर्ष मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पाहण्यात गेली, आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचीही जातील, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मलिक यांच्या टीकेला भाजप नेते आचार्य तुषार भोसले यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ‘नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री राहिले आहेत. तुमच्या नाकावर टिच्चून देवेंद्र फडणवीसजी लवकरच पुन्हा मुख्यमंत्री होतील.

कारण ते त्यांचं नाही तर जनतेचं स्वप्न आहे. जनतेने त्यांच्याच नेतृत्वावरच शिक्कामोर्तब केला होता. पण तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा जन्मच पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहण्यात जाणार ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तेव्हा ‘अल्प मंत्री’ असलेल्या आपण बहु चिंता करु नये’, अशी टीका भोसले यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा