‘झुकती हैै दुनिया, झुकानेवाला चाहिए’; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई: राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांसाठी येत्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना आपण १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येईल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी एका मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. त्या अॅपबाबत लवकरच माहिती दिली जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

याच मुद्यावरुन आता नितेश राणे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच ये लगा सिक्सर, भाजपसाठीचा मोठा विजय, असं देखील नितेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला सत्ताधारी पक्षातील नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा