“झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, अखेर शेतकऱ्यांनी करून दाखवलं”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 9 वाजता पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. यावेळी मोदींनी देशात नव्याने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यावर भाष्य केलं. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रानं विरोधकांचा विरोध डावलून संसदेत बळाच्या जोरावर संमत केलेल्या कृषी कायद्यांचा फायदा पुन्हा एकदा वाचून दाखवला.

सोबतच, हे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. या तपस्येत कमी राहिली असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. तसेच देशवासियांशी संवाद साधताना मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. तसेच संसदेत चर्चा झाली, नंतर हे कायदे आणले. देशातील कानाकोपऱ्यातील कोट्यवधी शेतकरी, अनेक शेतकरी संघटनांचे याचे स्वागत केले. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता सगळ्याच स्तरांवरून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, तीन कृषी कायदे अखेर मागे घेण्यात आले. देशाच्या शेतकऱ्यांना माझा सलाम आणि शहिद शेतकऱ्यांना माझं अभिवादन, अशी प्रतिक्रिया नवाब मलिकांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा