“जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे उमेदवार नाहीत, उपरे आणावे लागतात”

मुंबई : शिवसेना दसरा मेळावा होणार आहे, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. या मेळाव्यातल मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकताही सर्वांना लागून राहिली होता. अखेर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर थेट निशाणा साधला आहे. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात आज पार पडला.

प्रतिवर्षी शिवाजी पार्कवर होणार सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “आपला आवाज कोणी दाबू शकत नाही, आपला आवाज दाबणारा जन्माला यायचाय,” अशी सुरुवात करत अनेकांवर बाण डागला.

दरम्यान, भाजपवर आपल्या खास शैलीत ठाकरे यांनी टीका केली आहे. भाजपमध्ये 2019 पासून बाहेरच्या पक्षातून आलेल्यांची संख्या वाढली आहे. या उद्धच मुद्द्याला धरून ठाकरे यानी लक्ष वेधलं आहे. जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे उमेदवार नाहीत, उपरे आणावे लागतात, अशी जहरी टीका भाजपवर ठाकरे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा