InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

या कारणामुळे मेरी कोमचं ‘सुवर्ण’स्वप्न भंगलं, भारताने केली तक्रार

- Advertisement -

भारताची स्टार महिला बॉक्सर मेरी कोमला सातव्यांदा जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावण्याचं स्वप्न भंगलं आहे. टर्कीच्या बुसेन्झ कैरोग्लुने हीनं मेरी कोमला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात मेरी कोमनं कोलंबियाच्या व्हिक्टोरिया वेलेन्सियाविरुद्ध विजय मिळवला होता. सहावेळा विश्वविजेत्या मेरी कोमच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, उपांत्य फेरीत पराभवामुळे तिचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. मेरी कोमला कांस्यपदकावर समाधान मानावं लागणार आहे.

मेरी कोमनं पहिल्या दोन राऊंडमध्ये चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर नियंत्रण राखता आलं नाही. टर्कीच्या बुसेन्सनं आक्रमक खेळ सुरू केला. पहिल्या दोन राऊंडमध्ये कडवी झुंज बघायला मिळाली. मात्र, शेवटच्या काही मिनिटांत बुसेन्सनं आघाडी घेत मोरी कोमवर हल्लाबोल केला. शेवटी बुसेन्सला 1-4 अशा फरकाने विजयी घोषित करण्यात आलं. मात्र, भारताने मॅच रेफरींच्या निर्णयावर आक्षेप घेत तक्रार दाखल केली आहे.

Loading...

भारताने मॅच रेफरींच्या निर्णयावर आक्षेप घेत तक्रार दाखल केली आहे.

Loading...

- Advertisement -

वर्ल्ड़ चॅम्पिय़नशिपमध्ये मेरी कोमनं आतापर्यंत सहा सुवर्णपदकं पटकावली आहेत. याशिवाय एक रौप्यपदकही तिच्या नावावर होतं. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने 7 पदकं पटकावली होती.कांस्यपदकासह वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिच्या खात्यात 8 पदकं जमा झाली आहेत

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.