InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

…..तर मी राजकारणातून संन्यास घेईन – संजय काकडे

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती न केल्यास भाजपला मोठा फटका बसेल. ४८ पैकी ४० मतदारसंघ तर सोडाच पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना स्वत:च्या मतदारसंघातही जिंकता येणार नाही. त्यांचा दीड-दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केले. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतील संभाव्य परिस्थितीवर भाष्य केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेना सोबत आली नाही तरी आम्ही ४० जागांवर विजयी होऊ, असा दावा केला होता. मात्र, संजय काकडेंनी दानवेंचा हा दावा साफ फेटाळून लावला. शिवसेना सोबत न आल्यास रावसाहेब दानवे यांना स्वत:चा मतदारसंघ राखता येणार नाही, असा दावा काकडेंनी केला. यावेळी काकडे यांनी पुण्यातील भाजप नेत्यांविषयी नाराजीही व्यक्त केली.

भाजप तुमच्याबाबतीत ‘गरज सरो, वैद्य मरो’ वागत आहेत का, असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. तेव्हा माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उत्तम जमत असल्याचे सूचक वक्तव्यही काकडे यांनी केले.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.