‘… तर समीर वानखेडेंची बदली केली जाईल’, एनसीबी महासंचालकांचं मोठं वक्तव्य

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील एनसीबीचा छोपा बोगस होता, असा दावा करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे सातत्याने एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य करत आहेत. वानखेडे यांच्यावर मलिक यांनी वैयक्तिक आरोपही केले आहेत. समीर वानखेडे यांच्या जन्माच्या दाखल्यावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

तसेच, प्रभाकर साईल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात त्यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही सईल यांनी केला होता. याचबरोबर सध्या समीर वानखेडेंवर लाचखोरी, जातीचा बनावट दाखला, खंडणी वसुली असे अनेक आरोप नवाब मलिक यांनी केले आहेत.

यानंतर समीर वानखेडे हे अंतर्गत चौकशीसाठी दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात दाखल झाले आहेत. तिथे त्यांनी त्यांची बाजू मानधली आहे. त्यातच वानखेडेंवरील आरोपांच्या चौकशीसाठी चार वरिष्ठ अधिकारी आज मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती आहे. वानखेडेंवरील आरोपांच्या चौकशीमुळे त्यांच्या बदलीच्या चर्चांना उधाण आलं आहे. वानखेडेंच्या बदलीवर आता खुद्द एनसीबी महासंचालकांनी भाष्य केलं आहे.

एनसीबी महासंचालक एन.सी.प्रधान म्हटले की, ‘पुरावे असतील तरच समीर वानखेडेंच्या बदलीबद्दल अंतीम निर्णय घेण्यात येईल.’ समीर वानखेडेंच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे असतील तरच त्यांची बदली करायची की नाही हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं एनसीबी महासंचालक प्रधान यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सध्यातरी वानखेडेंची बदली होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा