‘..तेव्हा संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते’, नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा

मुंबई : भाजप आणि प्रसाद लाड यांची सेनाभवन फोडण्याची भाषा आणि संजय राऊत यांच्या सामनातील अग्रलेखात भाजपमधील नेत्यांवर केलेली टीका, यावरुन राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण आता रंगताना दिसत आहे. भाजपमध्ये उपऱ्यांना, बाटग्यांना स्थान नव्हतं.

पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी घणाघाती टीका आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केलीय. त्यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना थेट इशारा दिलाय. तसंच राऊतांवर जोरदार हल्लाही चढवला आहे.

नारायण राणे यांनी सेना सोडली तेव्हा सामना समोरच्या सभेत संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते. समोर आले तर ततपप होतं होतं आणि आता धमक्यांची भाषा वापरली जातेय. आम्ही खांद्यावर बंदूक ठेवत नाही. सेनाभवन आणि बाळासाहेबांबद्दल आदर आहे, अशा शब्दात नितेश राणे यांनी राऊतांवर हल्ला चढवला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा