“पाहुण्यांनी घरात किती दिवस मुक्काम करावा याला काही मर्यादा असतात”

मुंबई : गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून काल छापे टाकण्यात आले होते. तसेच जरंडेश्वर साखर कारखान्यावरही छापा टाकला. पार्थ पवार यांच्यासह अजित पवार यांच्याशी संबंधित लोकांच्या एकूण ४० रहिवाशांच्या आणि व्यावसायिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते.

तसेच हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे. याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. तसेच या सर्व घटनेवरून केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप गैरवापर करत असल्याचा आरोपही केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मुद्द्यावरून तपास यंत्रणांवर टीकास्त्र डागलं आहे.

याआधी शरद पवार म्हणाले होते कि, अजित पवारांकडे पाहुणे आलेत. पण यानंतर आता पाहुणे घरात किती दिवस राहणार याला काही मर्यादा असतात, जिथे छापे पडले तेथील चौकशी एका दिवसातही होऊ शकते, असं असताना 6 दिवस पाहुणचार घेणं कितपत योग्य? असा प्रश्नही शरद पवारांनी उपस्थित करत तपास यंत्रणांना टोला लगावला आहे.

तसेच शरद पवार म्हणाले की, ‘‘जिथे छापे पडले त्याची चौकशी दिवसभरात होणे शक्य आहे. पण हे अधिकारी सहा दिवस झाले तरी घरातून बाहेर पडत नाहीत. दिल्लीतून आदेश येईपर्यंत घरातून बाहेर पडायचे नाही, असे काही अधिकाऱ्यांकडूनच समजते. म्हणून हे सरकारी पाहुणे सहा दिवसांपासून मुक्काम ठोकून आहेत. सीबीआय, ईडी, एनसीबी, प्राप्तिकरसारख्या संस्थाचा केंद्र सरकार गैरवापर करत आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा