तीन पक्षांमध्ये मतभेद नाहीत, हे सरकार पाच वर्ष टिकेल याबद्दल शंका नाही: शरद पवार

बारामती : “राज्यातील महाविकास आघाडी सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. हे सरकार पाच वर्ष टिकेल याबद्दल शंका नाही,” असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी बोलत व्यक्त होते.

“तिन्ही पक्षांची सरकारमधील भूमिका हा एक भाग आहे, तर राजकीय पक्ष म्हणून संघटनेचं काम वाढवणं ही दुसरी बाजू आहे. राजकीय पक्षाला संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणं हे स्वाभाविक आहे. हा प्रयत्न करण्यासंदर्भात आमच्या सर्व पक्षांचं सामंजस्य आहे. यात कुठलेही मतभेद नाहीत,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय.

“महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना आम्ही काही मुद्यांवर एकत्र आलो. सरकार चालवताना काही प्रश्न निर्माण होत असतात. त्यावर मार्ग काढण्यासाठी यंत्रणा असावी अशी चर्चा झाली. या यंत्रणेत तिन्ही पक्षाचे नेते घेण्यात आले,” असंही शरद पवारांनी सांगितलं.

“कुठल्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी यंत्रणेतील सहा सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळे हे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. त्यातूनच हे सरकार पाच वर्षे टिकेल याबद्दल शंका नाही,” असं शरद पवारांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा