‘इतके गुन्हेगार मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत’

सिंधुदुर्ग : सुरवातीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केला. यानंतर अंमली पदार्थ पुरवठा प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’चा मालक रामकुमार तिवारी याला अटक केली. तर एनसीबीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना देखील काल रात्री अटक केली आहे. यामुळे एकापाठोपाठ एक अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या अडचणी वाढत आहेत.

यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याची बातमी समोर आली. २००६ सालापासून धनंजय मुंडे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते अशी तक्रार ओशिवरा पोलिस ठाण्य़ात रेणू शर्मा या महिलेने केली होती. यानंतर विरोधकांकडून मुंडेंवर टीका आणि त्यांच्या राजीनामा याबाबत वक्तव्य केली जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंट मुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला. राष्ट्रवादीत चाललय काय?? इतके गुन्हेगार मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत.’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.