‘शिवसेनेला पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन चालला आहे आणि त्यामध्ये तुम्ही फसत चालला आहात’

कोल्हापूर : राज्यात जिल्हा बँकांच्या निवडणुकांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच मुंबै बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती करत भाजपचे असलेले अध्यक्षपद आपल्याकडे खेचले. या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे. तर, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मात्र पराभव स्वीकारावा लागला.

भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराला समसमान मत पडल्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात भाजपचे उमेदवार विठ्ठल भोसले यांची उपाध्यक्षपदासाठी निवड झाली. युती करूनही उपाध्यक्षपद हातातून गेल्याने हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

’काल मुंबै बँकेची निवडणूक झाली, महाविकासआघाडीने चेअरमनशिप एकत्र लढवायची ठरवली. खरं म्हणजे, बँकांमध्ये पक्ष नसतात. मुंबै बँकेत देखील सगळ्यांनी मिळून बिनविरोध केली आणि मग दबावाने त्यामधील जे कलरवाले आहेत, यांनी वेगळा चेअरमन उभा केला. चला राष्ट्रवादीने चेअरनमन पदरात पाडून घेतला, शिवसेनेचा व्हाईस चेअरमन पडला? हे कसं झालं? शिवसेनेला हे कळत नाही की तुम्हाला पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन चालला आहे आणि त्यामध्ये तुम्ही फसत चालला आहात’, असेही पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा