कोरोना आणि रामदेव बाबा यांच्यात काहीच फरक नाही: राखी सावंत

मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत कायम चर्चेत पाहायला मिळते. राखी तिच्याच कायम धुंदीत बघायला मिळते. त्यातच ती असे काही वक्तव्य करते की त्यामुळे ती पुन्हा चर्चेत येते. आता राखीने कोरोनाची तुलना ही योगगुरु रामदेव बाबा यांच्याशी केली आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामद्वारे शेअर करण्यात आला आहे.

राखीने या व्हिडीओमध्ये पोल्का डॉटचा काळ्या रंगाचा टॉप घातला आहे. “अरे देवा, हा करोना आहे ना…करोना म्हणजे एकदम बाबा रामदेव यांच्यासारखा आहे. करोना कधी येतो, कधी लपतो तर कधी बाहेर निघून जातो,” असे राखी व्हिडीओमध्ये म्हणाली. राखीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून योगगुरू रामदेव बाबा देखील सतत चर्चेत आहेत. अ‍ॅलोपथी औषधांविरुद्ध वक्तव्य केल्याचा आणि पतंजलीच्या कोरोनिल किटमुळे कोविड-१९ बरा होतो, असा दावा त्यांनी केला होता. यामुळे त्यांच्यावर डॉक्टरांकडून नाराजी व्यक्त केली जातं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा