छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाल्याचा पुरावा नाही; सुप्रिया सुळेंनी दिला दाखला
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडण्याची चिन्हं आहेत. औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी कोश्यारी बोलत होते.
यावेळी बोलताना कोश्यारी यांनी म्हटलं की, चाणक्याविना चंद्रगुप्तांना कोण विचारेल? समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारणार? असं राज्यपालांनी म्हटलं आहे. गुरुचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे, असंही ते म्हणाले होते. या वादग्रस्त विधानावर आता यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा पुरावा नाही, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला आहे.
सुप्रिया सुळे यांनी यावर आक्षप घेत न्यायालयाच्या निकालाची प्रत ट्विटमध्ये टाकली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार… तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरु-शिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार…
'तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. pic.twitter.com/nA6cJKo9Rl— Supriya Sule (@supriya_sule) February 28, 2022
महत्वाच्या बातम्या
- “राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे”, उदयनराजेंचा इशारा
- ‘समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’ राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
- ‘समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’, राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य
- “मी एक रूपया जरी खाल्ला असेल तर मी धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर हात कलम करेल”
- बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ, राज्यपाल कोश्यारींनी दिले कारवाईचे आदेश
You must log in to post a comment.