मुंडेंवरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, या प्रकरणात राज्य सरकारवर कोणताही दबाव नाही

राज्याच्या राजकारणात सद्या एक चर्चेचा विषय समोर आलाय. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चेला उधाण आलय. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याची बातमी समोर आली. २००६ सालापासून धनंजय मुंडे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते अशी तक्रार ओशिवरा पोलिस ठाण्य़ात रेणू शर्मा या महिलेने केली होती.

यानंतर या प्रकरणाबरोबर मुंडे यांनी आपण करुणा शर्मासोबत परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं सांगितलं आहे. बलात्काराचे आरोप करणारी तरूणी हा करूणा शर्मा यांची बहीण आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री नबाव मलिक यांनी आणखी एक प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. या प्रकरणात राज्य सरकारवर कोणताही दबाव नाही. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, असं नबाव मलिक यांनी म्हटलं आहे.

कालही मंगळवारी आरोप झाले तेव्हा मलिक यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, एखादी तक्रार झाली तर चौकशी होतच आहे. पण जी आरोप करतेय ती कुठेतरी त्यांची नातेवाईक आहे.करुणा शर्मांच्या बहिणीशी धनंजय मुंडेंनी लग्न केलेलं आहे, दोन मुलंसुद्धा आहेत. याच्या मागे काय कारण आहे ते आता मुंडे साहेबच सांगू शकतील.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.