सद्या तरी आई बनण्याचा विचार नाही -दीपिका पादुकोण

आणि रणवीर सिंहच्या लग्नाला पुढच्या महिन्यात एकवर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यांच्या बाळाची चर्चाही सुरू झाली आहे. लग्नानंतर आतापर्यंत दीपिका प्रेग्नंट असल्याची कित्येकदा पसरली. मात्र दरवेळी दीपिकाने ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. दरवेळी हे स्पष्टिकरण देऊन वैतागलेल्या दीपिकाने याबाबत एकदाच स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.

‘मला आणि रणवीरला मुले हवी आहेत. मात्र आता नको. आम्ही त्याबाबत योग्यवेळी निर्णय घेणार आहोत. माझ्या प्रेग्नन्सीबाबत ज्या अफवा पसरत आहेत, त्याबाबत रणवीरलादेखील माहीती आहे. पण सध्या आम्ही दोघेही आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करणार आहोत.’असे दीपिका म्हणाली.

जर तुम्ही दीर्घकाळ एखाद्या रिलेशनशीपमध्ये असाल, तर मग लग्न कधी करणार? जर लग्न केले तर मग मुले कधी होणार? हे प्रश्‍न नेहमीच विचारले जातात, त्याबाबत आपल्याला वाईट वाटत असल्याचेही दीपिकाने सांगितले.

रणवीर आणि दीपिकाचे लग 14 नोव्हेंबर 2018 साली झाले होते. रणवीर आणि दीपिका दोघेही ’83′ मध्ये एकत्र दिसणार आहेत. याशिवाय ‘’ हा दीपिकाचा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.