InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आघाडीसोबत येण्याची ‘वंचित’ची मानसिकता नाही

विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र आघाडीसोबत येण्याची अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीची मानसिकता दिसत नाही, असे राष्टवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

राष्टवादीच्या उमेदवाराची नावे ३० जूनपर्यंत निश्चित केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्टवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी येत्या निवडणुकीत तरुणांना संधी द्यावी, शहरांकडे लक्ष द्यावे, अशा सूचना केल्या. यावर अजित पवार म्हणाले, पराभव कशामुळे झाला याची चर्चा करण्यात आता अर्थ नाही. आमचे लक्ष विधानसभेकडे आहे. शहरी भागात पक्ष वाढविणे प्रयत्न सुरु केले आहेत, नव्या चेहऱ्यांना या वेळी मोठ्या प्रमाणावर संधी देणार आहोत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.