InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘समोर कोणी पैलवान नाही, निवडणूक लढायची कोणाशी?’

- Advertisement -

समोर कोणी पैलवान नाही, निवडणूक लढायची कोणाशी, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिरपूर येथील प्रचारसभेत ते बोलत होते. काँग्रेसची तर अवस्थी इतकी वाईट झाली आहे की, इकडे निवडणूक लागली आहे, आणि त्यांचे नेते बँकॉकला गेले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, यावेळी शिरपूरचे काँग्रेसचे नेते माजी मंत्री अमरीश पटेल यांनी भाजपत प्रवेश केला. पटेल यांचे समर्थकही मोठ्या संख्येने भाजपमध्ये आले.

मुख्यमंत्री म्हणाले, ”विकासाला खरी दिशा पंतप्रधान मोदींनी दिली आहे. ते महाराष्ट्रासह देशात सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहेत. अमेरिकेतील दौऱ्यावेळी तेथील अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांनी दीड तास मोदींचे भाषण हजारो जनतेच्या साक्षीने ऐकले. त्यानंतर प्रभावित होऊन अमेरिकेच्या अध्यक्षांनी मोदी है वैश्विक नेते असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भारताला महासत्ता होण्यापासून आता कोणी आडवू शकत नाही. ते फक्त मोदींमुळेच शक्य होणार आहे. महाराष्ट्रात 50 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून, शेवटच्या पात्र शेतकऱ्याला जोपर्यंत लाभ दिला जात नाही. तोपर्यंत कर्जमाफी योजना बंद केली जाणार नाही. आघाडी सरकारने सिंचनातून आपल्या तिजोरी भरल्या. पण, युती सरकारने जलयुक्त शिवार अभियानासह वेगवेगळ्या सिंचन योजनातून आणि केंद्रातून निधी मिळवून प्रकल्प पूर्णत्वाच्या माध्यमातून राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काम केले.”

Loading...
Related Posts

लहान मुलाबरोबर कुस्ती खेळल्यावर पैशांऐवजी रेवड्या मिळतात, शरद…

- Advertisement -

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.