जुन्या गोष्टी काढण्यात अर्थ नाही; अजित पवारांचाही अमोल कोल्हेंना पाठिंबा

मुंबई : ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका करणारे राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे नव्या वादात सापडले आहेत. या त्यांचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे खासदार असताना गांधींची हत्या करणाऱ्या गोडसे यांचे समर्थन करणारी भूमिका तुम्ही कशी करू शकता, असा सवाल त्यांना विचारला जाऊ लागला आहे.

नथुराम गोडसेची भूमिका कोल्हे यांनी साकारल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यानंतर यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना विरोध होऊ लगाला आहे. मात्र यावर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘अमोल कोल्हेंच्या नथुरामला विरोध नाही’ असे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हे यांना पाठिंबा दर्शविला आहे.

शरद पवार साहेब अन जितेंद्र यांनी त्यांची भूमिका मांडली आणि मी माझीही भूमिका मांडली आहे. जुन्या गोष्टी काढण्यात अर्थ नाही, त्याने एक कलावंत म्हणून त्यांनी ऑफर स्वीकारली . पुरोगामी विचार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वीकारून ते राजकिय सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. यासंदर्भात मी अमोल कोल्हे याच्याशी चर्चा केली होती, त्याने ती भूमिका२०१७ ला केली. मीच त्यांना पवार साहेबांकडे घेऊन गेलो होतो. मग २०१९ ला निवडणूक लढले. त्यामुळे आता त्यावर घेण्यात अर्थ नाही, त्यामुळे कोणी पक्षात येण्याअगोदर काय केलं हे ज्याच त्याच प्रश्न आहे, असेही अजितदादा म्हणाले .

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या