InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

व्यक्तिचा मेंदू शांत असला की जगातही शांतता राहते – पंतप्रधान

जेव्हा व्यक्तिचा मेंदू शांत असेल तेव्हा कुटुंब, समाज, देश आणि जगातही शांतता कायम राहते. आरोग्य, कल्याण आणि शांततेसाठी जगाला भारताने दिलेली ही एक खास भेट आहे. जी-२० शिखर परिषदेत जागतिक मुद्दे, निरंतर विकास, जलवायू परिवर्तन, फरार आर्थिक घोटाळ्यातील आरोपींसारख्या मुद्यांवर चर्चा केली जाणार असल्याचे मोदी म्हणाले. हे फक्त भारत किंवा अर्जेंटिनाच्या फायद्याचे नाही तर यात जगाचे हित असल्याचेही ते म्हणाले. .

यावेळी पंतप्रधानांची सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान अल सौद यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक झाली. तत्पूर्वी त्यांनी ओडिशा येथे आयोजित हॉकी विश्वचषकातील पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानिमित्त अर्जेंटिना संघाचे अभिनंदन केले आणि भारतीय हॉकी संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.